top of page

Cotton Products

 बोलगार्ड २ मध्ये दोन जनुके आहे, क्राय १ एसी व क्राय २ एबी ह्या दुहेरी जनुकामुळे प्राथमिक बोंड अळ्या जसे की अमेरिकन बोंडअळी, टिपकेदार बोंडअळी (फरिआस ), गुलाबी बोंडअळी (पेक्टिनोफोरा ), तसेच दुय्यम लेपिडोप्टेरन्स जसे तंबाखु पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा) सुध्दा नियंत्रित राहते. मात्र हे तंत्रज्ञान रसशोषक किड्यापासुन संरक्षण करीत नाही. कृषि व शेतकारी कल्याण मंत्रालय, सहकारी, कृषि व शेतकारी कल्याण विभाग भारत सरकार नुसार गॅझेट नोटीफिकेशन क्र. एस. ओ. ४२१५ (ई) दिनांक २७.१२.२०१६ प्रमाणे प्रत्येक पॅकेट मधिल बीटी बियाणे हे ५% गैर बीटी बियाणे मिश्रीत आहे.

रेफ्युजीया इन बॅग (RIB) किटकांची प्रतिकार क्षमता व्यवस्थापन संकल्पना : वीटी कपाशीच्या बियाण्याच्या पॅकेट मध्ये ५% गैर बीटी बियाणे मिश्रीत करणे याला RIB संकल्पना म्हणतात. हे गैर वीटी बियाणे पेरणीनंतर कालावधी करीता व तंतुधागा गुणवत्तेत बीटी बियाण्यांसारखेच असते. RIB मुळे अल्प उत्पादन तोटा अपेक्षित आहे परंतु किटकांमध्ये बीटी विरुद्ध निर्माण होणरी प्रतिकार क्षमता टळुन हे तंत्रज्ञान जास्त काळासाठी प्रभावी ठरू शकते.

बोलगार्ड २ चे महत्व : बोंडअळ्याविरूध्द अत्यंत प्रभावी, ईतर वीटी पर्यायापेक्षा कमी रासायनीक फवारणीची गरज. बोलगार्ड २ लागवाडीपासुन जास्तीत जास्त फायदे मिळविण्यासाठी पुढील मार्गदशर्शक बाबींचा अवलंब करावा. 

मीन तयार करणे : शेतीच्या सफाईसाठी आधीच्या पीकांचा कचरा गोळा करून जाळून टाकावा, जमीनीव्दारे पसरणारे रोग, किड आणि तण यांचे प्रमाण कमी करण्यासाठी दोनदा खोल उन्हाळी नांगरणी करून उभी आडवी वखरणी करावी. 

शेण खत : हेक्टरी ५ ते ६ टन शेणखत पेरणीच्या ३-४ आठवडे आधी सारख्या प्रमाणात पसरवुन द्यावे. 

रासायनीक खते : माती परिक्षणानुसार किंवा स्थानिक प्रचलित पध्दतीप्रमाणे रासायनीक खतांची मात्रा देण्यात यावी. 

अंतर : आपल्या भागातील प्रचलित पध्दतीप्रमाणे दोन झाडांमधील अंतर ठेवावे. 

पेरणीची पध्दत : झाडांची योग्य संख्या राखण्यासाठी एकाजागी दोन बियांची लागवड करावी. उगवणीनंतर जोमदार वाढलेले झाड ठेवुन दुसरे कमकुवत झाड उपटुन टाकावे. 

खाडे भरणे : झाडांची संख्या योग्य ठेवण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे एका आठवड्याच्या आंत खाडे भरावे. 

आंतर मशागत आणि तण नियंत्रण आवश्यकते नुसार निंदणी व कोळपणी करावी. त्यामुळे जमीनीमध्ये हवा खेळती राहुन ओलावा टिकून राहण्यास मदत होते. शिफारशीनुसार तणनाशकाचा वापर करावा. 

सिंचन : उगवण, रोपट्याची वाढ, पाती व फुल लागण्याची अवस्था तसेच बोंड परिपक्व व विकास अवस्थामध्ये पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता ध्यावी. कापुस या पीकावर पाणी साचल्याने त्वरित परिणाम होतो. त्यामुळे शेतामधून पाणी निचरा होईल याची काळजी घ्यावी. 

एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन : खालीलप्रमाणे एकात्मिक किड व रोग व्यवस्थापनचा वापर करावा. 

१. पुर्वी सांगितल्याप्रमाणे उन्हाळ्यात नांगरणी व शेतीची साफसफाई करावी. 

२. बीज प्रक्रिया : रसशोषक किटकांच्या नियंत्रणासाठी बोलगार्ड २ बियाणांवर बीज प्रक्रिया उपाय आधीच केलेला आहे. 

३. रसशोषक किटकांचे नियंत्रण : पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत जर रसशेषक किटकांच्या संसर्गाने आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडली तर 

नियंत्रणासाठी शिफारशी प्रमाणे किटकनाशकाची फवारणी करावी.

किड                     आर्थिक नुकसानीची पातळी 

तुडतूडे                  पानागणिक छोट्या किंवा प्रौढ अवस्थेतील १-२ किटक

पांढरी माशी              पानागणिक छोट्या किंवा प्रौढ अवस्थेतील ८-१० किटक

मावा                        १०% रोपांवर प्रदुर्भाव 

फुलकिडे                 पानागणिक छोट्या किंवा प्रौढ अवस्थेतील १०-२० किटक

कोळी                        पानागणिक छोट्या किंवा प्रौढ अवस्थेतील १० किटक 

४. बोंडअळी व्यवस्थापन : आर्थिक नुकसान पातळीवर आधारित फवारणी जर बोंडअळीच्या प्रादुर्भावाचे प्रमाण आर्थिक नुकसान पातळी पेक्षा वाढले तर बोंडअळी व्यवस्थापनाच्या फवारणीची आवश्यकता आहे. प्रादुर्भावाचे प्रमाण अर्थिक नुकसानीची पातळी ओलांडते किंवा नाही यावर नियंत्रण ठेवणयासाठी आठवड्यातुन एकदा बोलगार्ड २ चे शेत खालील प्रमाणे तपासा : 

1. 

अमेरिकन बोंडअळी (हिरवी बोंडअळी) साठी एका एकराच्या विविध भागातील २० झाडे निवडा, जर २ किंवा अधिक अमेरिकन बोंडअळी (२० झाडामधुन ) किंवा या निवडलेल्या झाडांच्या बोंडापैकी १०% बोंड अमेरिकन बोंडअळीच्या नुकसानाने ग्रस्त दिसली तर समजावे की आर्थिक नुकसानीची पातळी गाठली आहे. 

II. गुलाबी बोंडअळीसाठी : एका एकराच्या विविध भागातुन २० फुले किंवा २० बोंडे निवडा आणि त्यातील गुलाबी बोंडअळीची संख्या मोजा, जर २ किंवा अधिक गुलाबी बोंडअळ्या निघाल्या तर समजावे की आर्थिक नुकसानीची सीमा ओलांडली आहे. आर्थिक नुकसानीची पातळी कामगंध सापळ्याचा वापर करून देखिल ठरविता येते (प्रती एकर ३ कामगंध सापळे ) जर दर सापळ्यात सलग ३ रात्री ८ किंवा जास्त गुलाबी बोंडअळीची फुलपाखर आढळली तर आर्थिक नुकसान पातळी ओलांडली समजावे. आपल्या भागातील कृषी विद्यापाठ किंवा कृषी विभागाने सुचविलेल्या किटकनाशकाची फवारणी करावी. 

नोंद: बीटी बियाण्याच्या नियंत्रणात नसलेल्या इतर किटक लष्करी अळी, स्पोडोप्टेरा, स्टेम, विवील इत्यादीसाठी शिफारसयुक्त किटक नाशकांचा वापर 

करावा. 

५. बोलगार्ड च्या मशगतीसाठी शिफारस केलेल्या इतर आय. पी. एम. पध्दती वापरता येतील त्यात फेरोमोन सापळा / प्रकाश सापळे / पक्षांना बसण्यासाठी 

जागा, नैसर्गिक शत्रुंचा वापर, जैविक किटकनाशके (एच.ए.एन. पी. व्ही., कडूलिंब ) इत्यादींचा सामावेश आहे. 

६. एकाच वर्गातील किटकनाशकाचा वापर वारंवार करणे टाळावे. 

७. पीकांची वेळेवर विल्हेवाट करावी. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळुन आल्यास फरदड घेणे टाळावे. फरदड घेतल्यास गुलावी बोंडअळीचा पुढील हंगामात 

प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. 

८. शेतीची साफसफाई: गुलाबी बोंडअळीचे कोष अर्धवट उमललेल्या बोंडामध्ये व न उमललेल्या बोंडामध्ये असतात ते गोळा करून त्याचा नायनाट करावा. ९. खोलवर नांगरणी : बोंडअळीच्या नायनाटासाठी पीक काढणीनंतर खोलवर नांगरणी करावी जेणे करून गुलाबी बोंडअळीचे प्रभावी नियंत्रण करता येईल. कपाशीवरील प्रादुर्भाव करणाऱ्या रोगाचे व्यवस्थापन : अल्टरनॅरीया पानावरील टिपके, दहीया, लिफ ब्लाईट आणि बोंड सडणे या रोगांच्या नियंत्रणासाठी गरजेनुसार शिफारशीकृत पध्दतीचा वापर करावा. 

कपाशीच्या पीकांवर प्रामुख्याने आढळणारे रोग : 

करपा / अल्टरनॅरीया लिफ ब्लाईट : हा रोग पानावरील लहान फिक्कट तपकिरी रंगाच्या वाटोळ्या ठिपक्यांच्या स्वरूपात सुरवातीला दिसु शकतो. हळुहळु हे ठिपके मोठे होत जातात व केंद्राभोवती खाचा पाडुन मोठे होत जातात. 

करपा / सर्कोस्पोरा लिफ स्पॉट : ह्या रोगाच्या लक्षणाची सुरवात पानावरील लालसर ठिपक्याच्या स्वरूपात होते, हळुहळु ह्याचा व्यास वाढत जावुन अखेरीस लाल रंगाचा किनारा व त्यात मृत झालेल्या पांढ-या ते हलक्या तपकिरी रंगाच्या मृत पेशींचा मध्यबिंदु उरतो. 

दहिया / ग्रे मिल्ड्यू : पानावरील अनियमित, कोनीक पिवळट हिरव्या रंगाच्या ठिपक्यांनी दहिया रोगाच्या लक्षणाची सुरवात दिसू लगते. हे चट्टे हळुहळु पिवळसर ते लालसर तपकिरी रंगाचे होतात आणि पांढ-या बुरशीची वाढ मुख्यातः खालच्या पृष्ठभागावर व कधीकधी वरच्या बाजुला दिसू लागते.

बॅक्टेरीयल ब्लाईट : ह्या रोगाची लक्षणे म्हणजे पानावरील कोनीक ठिपके, काळीशिर किंवा शिरांवर ठिपके, खोड व फांद्यावरील ठिपके व बोंडावर तेलकट चट्टे दिसतात. कालांतराने तपकिरी रंगापासुन ते काळ्यारंगापर्यंत सुध्दा चट्टे जातात. 

व्यवस्थापन : 

१. पुरेशे पोषण व योग्य सिंचन व्यवस्थापन यामुळे पाने रोगाला लवकर बळी पडणार नाहीत व पीकांचे संरक्षण होईल. ज्या शेतांना मर रोग येण्याचा पूर्व 

इतिहास आहे त्या शेतात कापसाचे पीक घेणे टाळावे. 

२. पुरेशे शेणखत देण्यावर भर द्यावा. 

३. लागवड करतांना दोन ओळीमध्ये जास्त अंतर ठेवा किंवा पट्टापध्दतीने लागवड करा त्यामुळे झाडामध्ये दमट वातावरण राहणार नाही. 

४. प्रभावित / रोगट पाने काढून टाकणे व ती नष्ट करणे यामुळे पानांवरील ठिपक्यांची तीव्रता कमी होईल. 

५. कॉपर ऑक्सीक्लोराईड किंवा २ ते २.५ ग्राम वेटेबल सल्फर + १ ते १.५ ग्राम बाविस्टीन प्रति लीटर ची फवारणी बुरशीच्या ठिपक्यांच्या नियंत्रणासाठी करावी. बॅक्टेरियल लीफ ब्लाईट च्या नियंत्रणसाठी किंवा २ ते २.५ ग्राम कॉपर ऑक्सीक्लोराईड + ०.१ ग्राम बाविस्टीन + ०.१ ग्राम स्ट्रेप्टोसायाक्लिन ची फवरणी करावी. 

६. बुरशी व बॅक्टेरियल रोगच्या संमिश्र प्रादुर्भावांच नियंत्रण २ ते २.५ ग्राम कॉपर ऑक्सीक्लोराईड + १.५ ग्राम बाविस्टीन + ०.१ ग्राम स्ट्रेप्टोसायाक्लिन प्रति 

लीटर च्या फवारणीने होऊ शकते. 

७. रोगाची प्राथमिक लक्षणं दिसताच फवारणी सुरू करावी व १५-२० दिवसांच्या अंतराने २-३ वेळा करावी. 

कपाशी पीकावरील मर रोगचे व्यवस्थापन : हलक्या व मध्यम प्रकारच्या जमीनीमध्ये पाण्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये ह्या रोगाची लक्षणे अधिक असते. फ्युझेरियम ऑक्सीस्पोरम, रायझोक्टानिया सोलानी व रायझोक्टानिया बॅटाटीकोला हे प्रमुख जैविक घटक आहेत. जमीनीमध्ये पाणी साचल्यामुळे मर रोग आढळुन आल्यास तात्काळ पाण्याचा निचरा करावा व आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा वापर जमीनमध्ये करावा. 

रोग पीकाच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेत येवू शकते, मोठ्या झाडांवर फुले येण्याच्या किंवा बोंडे धरण्याच्या वेळी ही लक्षणे ठळकपणे दिसुन येतात लागण झालेली झाडे निस्तेज मलुल दिसतात व पाने रंगाने फिक्कट हिरवी पिवळसर होता व हळुहळु झाड वाळते. पायापासुन वरच्या दिशेने खोडाचा रंग काही प्रमाणात कमी होणे, वाहीन्या किंवा शिरांचा रंग उडणे आणि मुळे टोकाकडुन सडणे ह्या गोष्टी झाडे मलूल पडण्याच्या अवस्थेमध्ये आढळून येतात. ह्या 

रोगाच्या शेवटच्या अअवस्थेत खोडापासून वर रंग थोड्याप्रमाणात बदलतो. खोडाच्या आतील वाहिन्यांचा रंग फिक्कट होतो व तसेच मुळे सडतात. 

व्यवस्थापन : 

१. हलक्या मातीत जर पीक घेतले असेल तर वेळेवर पाणीपुरवठा केल्यास पीक वाळुन जाण्यापासुन वाचविता येईल. 

२. ज्या शेतांना मर रोग येण्याचा पूर्व ईतिहास आहे त्या शेतात कापसाचे पीक घेणे टाळावे. 

३. शेणखत देण्यावर भर द्यावा. 

४. पीक वाढीच्या अवस्थेत नायट्रोफॉस्क ३ ग्राम / लीटर दराने फवारावे व फुले येण्याच्या वेळी नायट्रोफस्क ३ ग्राम / लीटर + प्लॅनोफिक्स ०.३ मि.लि. / लीटर 

दराने फवारावे. 

प्रौढ झाडांवरील मर रोगाचे नियंत्रण : 

१. पेरणीनंतर ५०-६० दिवसांनी बॅविस्टीन (कार्बेनडाझिम) + कॉन्टाफ (हेक्साकोनॅझोल) किंवा शीथमार (व्हॅलिडामाइसिन ) ३ ग्राम / लीटर (०.५-१ लि. 

/ झाड) या दराने झाडाच्या बुडाशी टाकावे. 

२. मर रोगाची लक्षमे दिसुन येताच ताबडतोब पाण्याचा निचरा करावा.

वेचणी: प्रचलित वेचणी पध्दतीने बोलगार्ड २ ची वेचणी करावी. 

अस्वीकरण: या पत्रकातील मार्गदर्शक तत्त्वे विविध प्रकाशने / स्रोतांकडून एकत्रित केली आहेत. तथापि, मातीचा प्रकार, प्रतिकूल हवामान आणि हंगाम्, अपुरे / निकृष्ट पीक व्यवस्थापन आणि कीड आणि रोगांचे आक्रमण यामुळे पीक आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. पीक व्यवस्थापन हे आमच्या नियंत्रणाबाहेर आहे त्यामुळे उत्पादन / उत्पादनासाठी शेतकरी पूर्णपणे जबाबदार आहेत. तथापि, आम्ही त्यांना योग्य वेळी बियाणे पेरून आणि इष्टतम पीक व्यवस्थापनाद्वारे जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्यासाठी सुचवतो. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करूनही पीक अपयशासाठी कंपनी जबाबदार राहणार नाही. 

कारभारी मार्गदर्शन: 

"बोलगार्ड ॥ ® कापूस तंत्रज्ञानाची योग्य कामगिरी ही केंद्र आणि/किंवा राज्य कृषी संस्थांनी जारी केलेल्या कापूस पीक व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वांद्वारे शिफारस केलेल्या उत्पादन वापराच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. या उत्पादनाच्या वापराच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास या कीटक - सहनशील तंत्रज्ञानाची निकृष्ठ कामगिरी होऊ शकते. गुलाबी बोंडअळीच्या प्रतिकारासह, प्रचलित पर्यावरणीय परिस्थितीमुळे उच्च बोंडअळीच्या प्रादुर्भावाची परिस्थिती, जर असेल तर, कीटक कमी करण्यासाठी ETL (आर्थिक उंबरठा पातळी) वर आधारित शिफारस केलेल्या पीक संरक्षण उपायांचा अवलंब करणे आवश्यक आहे. या तंत्रज्ञानाचा परवानाधारक शिफारस केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात शेतकऱ्यांच्या अयशस्वी झाल्यामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही कार्यप्रदर्शन समस्यांसाठी जबाबदार असणार नाही किंवा जर्मप्लाझमशी संबंधित कामगिरीच्या समस्यांसाठी तो जबाबदार असणार नाही." 

Contact Us

Address

6th Floor, Rajarajeshwari nagar, Vasantha Golden Residency, 4-521 & 536/VG/601, Rajarajeshwari Nagar, Kondapur, Hyderabad, Telangana 500084, India

Contact

+91 9000210022

+91 9440210003

Opening Hours

Mon - Fri

9:00 am – 6:00 pm

Saturday

9:00 am – 6:00 pm

​Sunday

9:00 am – 6:00 pm

  • Facebook
  • Youtube

© Copyright 2012 - 2023 | Vasanth Agri Biotech Private Limited | All rights reserved | Privacy Policy | Disclaimer

bottom of page